मोदी अमिताभपेक्षा ही चांगले अॅक्टर राहुल गांधीचा मोदींना टोला

Amitabh vs Rahul Gandhi

टीम महाराष्ट्र देशा – नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरजच लागत नाही असं राहुल म्हणाले. गुजरात निवडणुकांच्या दोन-तीन दिवस अगोदर या अभिनेत्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येतील. ते सर्व मुद्द्यांवर बोलतील पण कर्जमाफी झाली की नाही, गुजरातमधील शेतक-यांना उत्पादनाचे किती पैसे मिळतात यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार नाही

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावूक भाषणांवर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता आहेत असं राहुल गांधी म्हणाले. गुजरातच्या सावरकुंडला येथे एका रॅलीमध्ये बोलताना राहुल यांनी मोदींवर टीका केली.