श्रीकृष्ण देशाचं आराध्य दैवत ,राम केवळ उत्तर भारताचे दैवत- मुलायमसिंह यादव

टीम महाराष्ट्र देशा – भाजपच्या राम मंदिर आंदोलनातील हवा काढून घेण्यासाठी समाजवादी पक्षाने आता ‘जय श्रीकृष्ण’चा नारा दिला आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनी सैफईत श्रीकृष्णाची ५० फूट उंच मूर्ती बसविण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव त्यासाठी वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. ‘राम हे केवळ उत्तर भारतापुरते मर्यादित असून श्रीकृष्ण संपूर्ण देशाचं आराध्य दैवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एवढंच नव्हे, रामापेक्षा कृष्ण अधिक पूजनीय असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘प्रभू राम आपले आदर्श आहेतच. पण श्रीकृष्णाने समाजातील प्रत्येक घटकाला समान मानलं आहे. त्यामुळेच श्रीकृष्णाची देशभर पूजा होते आणि राम केवळ उत्तर भारतातच पुजले जातात,’ असं मुलायम म्हणाले. ‘यादव हे श्रीकृष्णाचे वंशज आहेत आणि श्रीकृष्णाप्रमाणेच यादव समाजही सर्वांना समान मानतो. श्रीकृष्ण आपल्या देशाचं आराध्य दैवत आहेतच, पण देशाबाहेरही त्यांची पूजा केली जाते,’ असंही ते म्हणाले.
गाझियाबादमधील एका विवाह समारंभाच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.