Video- अशा स्वरुपाचे अत्याचार करण्याची हिंमत कोणी करणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा –  न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वाढेल. न्यायालयाने दोषींना कठोर शिक्षा सुनावल्यामुळे अनेक नराधम यातून धडा घेतील आणि अशा स्वरुपाचे अत्याचार करण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उज्ज्वल निकम यांच्यासारखे निष्णात वकील सरकारने नियुक्त केले होते. विक्रमी वेळेमध्ये या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. खटल्यात विलंब व्हावा यासाठी आरोपीच्या वकिलांनी प्रयत्न केले, मात्र न्यायालयाने आरोपीला दंड ठोठावला आणि सरकारी वकिलांनीही ते प्रयत्न हाणून पाडले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
फडणवीस पुढे म्हणाले, कोपर्डीतील पीडित आता परत येऊ शकणार नाही, पण न्यायालयाच्या निकालामुळे तिच्या आत्म्याला शांती मिळेल. या निकालामुळे जनतेचा न्यायालयावरील विश्वास वाढेल. मी उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन करतो, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे काम केले, अशा प्रकारची शिक्षा झाल्याने अनेकांना धडा मिळेल, असेही त्यांनी म्हटले.

कोपर्डी प्रकरणातील न्यायालयाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, कोपर्डीतील घटना निंदनीयच होती. ज्या पद्धतीने पीडितेवर अत्याचार झाले ते निषेधार्हच होते. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तपास यंत्रणांनीही आरोपींना तात्काळ अटक केली होती, असे त्यांनी सांगितले.

 

You might also like
Comments
Loading...