fbpx

एखाद्याच्या जीवावर उठणे खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही- नांगरे पाटील

Vishwas-Nangre-Patil

टीम महाराष्ट्र देशा – अधिकाऱ्यासह  पोलिसांनी जबाबदारीचे भान ठेऊन कायद्याची बंधने पाळावीत, अशा स्पष्ट सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परीक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांतील जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बैठकीत शुक्रवारी दिल्या. वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व अन्य पोलिसांकडून सांगलीत घडलेल्या अमानुष कृत्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेत्रांतर्गत पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक व पोलिस उपअधीक्षक (गृह) यांची तातडीची बैठक पोलिस मुख्यालयात झाली.

नांगरे-पाटील म्हणाले, सांगलीतील घटनेमुळे पोलिस यंत्रणेला मानहानीला सामोरे जावे लागत आहे. पोलिस दलावरील सर्वसामान्यांच्या विश्वासाला बाधा निर्माण झाली आहे. आपण काय करतो, याचे भान असायला हवे. कायदा सर्वांना समान आहे. त्याचे पालन होणे गरजेचे आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्यांचे कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांवर नियंत्रण हवे, असे स्पष्ट करून अयोग्य व पोलिस यंत्रणेला बाधा निर्माण करणार्या कृतीचे कोणीही समर्थन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिस ठाण्यात येणार्;यांना सौजन्यांची वागवणूक देण्यासाठी वरिष्ठस्तरावर प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे गुन्हेगारासारखे वर्तन ठेवून एखाद्याच्या जीवावर उठणे खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, असेही त्यांनी अधिकार्यांना स्पष्ट शब्दांत बजाविले. बैठकीला पोलिस अधीक्षक संजय मोहिते (कोल्हापूर) दत्तात्रय शिंदे (सांगली), संदीप पाटील (सातारा), डॉ. विरेश प्रभू (सोलापूर ग्रामीण) यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, डॉ. दिनेश बारी आदी अधिकारी उपस्थित होते.