fbpx

ही पहिली भारतीय महिला रेसलर उतरणार WWE च्या रिंगणात

updated /kavita-devi-first-indian-woman-wrestler-who-playing-in-wwe-1

WWE लहानांपासून मोठ्यापर्यत सर्वांचा आवडता कार्यक्रम. या कार्यक्रमाचे  भारतासह जगभरात चहाते आहेत. पण WWE मध्ये आधी पुरुषच रेसलिंग करती हळूहळू महिला देखील सह्भागी होऊ लागल्या. जगभरातील अनेक देशातील  महिला सहभागी झाल्या पण भारतातून आतापर्यत एकही महिला सहभागी झालेली नाही. लवकरच एक भारतीय महिलाWWE च मैदान गाजविण्यास सज्ज आहे.

पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी ही WWEच्या रिंगणात उतरणार आहे. तिने नुकतेच यासंबंधी WWE बरोबर करार केला आहे. कविता देवी WWEमधील पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार आहे. जिंदर महलनेच यासंबंधीची माहिती आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान दिली.

मुळची हरयाणाची असलेल्या कविताने रेसलिंगचे व्यावसायिक प्रशिक्षण द ग्रेट खली (दलीपसिंग राणा) याच्या पंजाबमधील अॅकडमीमध्ये पूर्ण केले आहे. महिला कुस्तीपटू बी बी बुल बुल विरूद्ध लढतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कविता देवी कमालीची लोकप्रिय झाली होती.

विशेष म्हणजे कविता देवीने २०१६ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पॉवकविता देवीने यापूर्वी महिलांच्या मई यंग क्लासिक टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवला होता. पुढीलवर्षी जानेवारी महिन्यापासून WWEच्या ओरलँडो येथील परफॉर्मन्स सेंटरमध्ये तिच्या प्रशिक्षणास सुरूवात होईल.

WWEमध्ये सहभागी होणारी भारताची पहिली महिला खेळाडू होणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे कविता देवीने म्हटले आहे. मई यंग या जागतिक स्पर्धेत सहभाग नोंदवल्याचा मोठा फायदा झाला. जागतिक दर्जाच्या महिला रेसलरचा यात समावेश होता. माझ“यासाठी ही स्पर्धा अनुभव देणारी ठरली. आता WWE च्या महिला चॅम्पियनशीपचं जेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्याची मला संधी आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.रलिफ्टींगमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

 updated /kavita-devi-first-indian-woman-wrestler-who-playing-in-wwe-1
file photo