महिलांनी रात्री रस्त्यावर फिरण्याची गरजच नाही कर्नाटकचे गृहमंत्री आर रामलिंगा रेड्डी वादग्रस्त वक्तव्य

ramliga reddy

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकचे गृहमंत्री आर रामलिंगा रेड्डी यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रेड्डी म्हणाले की, महिलांनी रात्री बेंगळुरूच्या रस्त्यावर फिरण्याची गरजच नाही. विधान परिषदेत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चेदरम्यान रेड्डी यांनी असं वक्तव्य केलं. मात्र मीडियाने या वक्तव्याबाबत त्यांना विचारणा केल्यावर आपण असं वक्तव्य केलं नसल्याचा दावा त्यांनी केला.

बेंगळुरू शहराची लोकसंख्या १ कोटीहून अधिक आहे, त्यामुळे सर्वांना सुरक्षा पुरवली जाऊ शकत नाही, असं बेजबाबदार वक्तव्य रेड्डी यांनी केलं. याच वर्षी बेंगळुरूमध्ये मुलींसोबत झालेल्या सामूहिक छेडछाडीबाबत माजी गृहमंत्री यांनीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं की, क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान अशा घटना होत असतात. त्यामुळे कर्नाटक सरकार महिला सुरक्षेच्या बाबतीत गंभीर आहे की नाही असा सवाल तेथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Loading...