fbpx

कमल हसनला गोळ्या घातल्या पाहिजेत – हिंदू महासभा

टीम महाराष्ट्र देशा – कमल हसन आणि त्यांच्यासारख्यांना धडा शिकवण्यासाठी एकतर गोळ्या घालून हत्या केली पाहिजे, किंवा फासावर लटकवलं पाहिजे. हिंदू धर्मासाठी अपमानास्पद भाषा वापरणा-यांना जगण्याचा कोणताच हक्क नाही. असं अपमान कोणी करत असेल तर त्याला जगण्याचा अधिकार नाही. लवकरच राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असलेल्या अभिनेता कमल हसन आणि त्यांच्यासारख्या लोकांची गोळ्या घालून हत्या केली पाहिजे असं अखिल भारतीय हिंदू महासभेने म्हटलं आहे.

कमल हासन यांनी हिंदू दहशतवादावर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभुमीवर हिंदू महासभेने ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे’, असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला होता.