जिओच्या ग्राहकांना करता येणार मोफत शॉपिंग

जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

टीम महाराष्ट्र देशा – रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीत धमाका केल्यानंतर आता रिलायन्स आणखी एक धमाका करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ आपल्या ग्राहकांना फ्रि शॉपिंग करवण्याची तयारी करत आहे.देशातील वाढत्या डिजिटल पेमेंटला बघता जिओ आता ई-कॉमर्स मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहे. यामाध्यमातून जिओ लोकप्रिय अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांना टक्कर देणार आहे.

जिओ मनीतून सुविधा देण्याची तयारी
कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिओ कॉर्नर स्टोर, किराणा दुकाने आणि कंज्यूमर ब्रॅण्डससोबत संपर्कात आहे. जिओ कंपनीचे ग्राहक जिओ मनी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. डिजिटल कूपनच्या माध्यमातून शेजारच्या दुकानातून खरेदी केली जात आहे. सध्या जिओ मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये ई-बिझनेस सुरू करत आहे. येत्या काही दिवसात ही सेवा इतरही शहरांमध्ये सुरू होईल.

काय मिळणार सुविधा?
सध्या जिओ आपल्या मोबाईल ग्राहकांना विशेष ब्रॅन्डच्या प्रॉडक्टसाठी डिजिटल कूपन देतील. यूजर्स या डिजिटल कूपनच्या माध्यमातून या ब्रॅन्डवर शॉपिंग करू शकतील. शेजारच्या कोणत्याही स्टोरमध्ये हे कूपन घेतले जातील. ज्या स्टोरसोबत पार्टनरशिप झाली असेल त्याच ठिकाणी हे कूपन चालतील. ब्रॅन्ड पार्टनर आपल्या प्रॉडक्ट्सचे प्रमोशन ऑफर्स जिओ ग्राहकांना पाठवू शकतील