मी भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या

टीम महाराष्ट्र देशा – आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी क्षीरसागर यांच्यासोबत बीडपर्यंत विमानप्रवास केला. एवढंच नव्हे तर क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापानही केलं. त्यामुळं क्षीरसागर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालीय.

मात्र, मुख्यमंत्री केवळ चहापानासाठी आले होते. त्यांच्यासोबत कसलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं क्षीरसागरांनी स्पष्ट केलंय. मी पक्षावर नाराज आहे की नाही हा नंतरचा भाग… असं सांगतानाच योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.Loading…
Loading...