जबड्याच्या सांध्यातील गुंतागुंतीच्या ट्युमर शस्त्रक्रियेतून 21 वर्षीय काश्मिरी रूग्णाची सुटका !

Dr. J.B.Garde surgery team with patient

पुणे : जम्मू-काश्मीरमधील 21 वर्षीय रुग्ण मुलीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ, अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये यशस्वीरित्या पार पडली.Dr. J.B.Garde surgery patient 1

डॉ. जे.बी.गार्डे (एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसच्या) ‘ओरल अॅण्ड मॅक्सिलोफेशिअल’ चे विभाग प्रमुख यांनी दिनांक 9 जुलै रोजी सलग सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. आज ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रिपोर्ट आले.Dr. J.B.Garde surgery patient 1

या दुर्मिळ शस्त्रक्रियेमध्ये डॉ. जे.बी.गार्डे यांना डॉ.हर्षल भागवत, डॉ. गौरव खुटवड, डॉ.मनिषा बिजलानी, रंगूनवाला डेंटल सायन्सेस महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Dr. J.B.Garde surgery patient Jaw

‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, डॉ.परवेझ इनामदार (व्यवस्थापकिय संचालक, इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ.रमणदीप दुग्गल (प्राचार्य, एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस), आर.ए.शेख ( रजिस्ट्रार ) यांनी ही शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यासाठी डॉक्टर चमूला प्रोत्साहन दिले. डॉ.जे.बी.गार्डे यांनी ही शस्त्रक्रिया विना मानधन केली.

रूग्णाचा उजव्या बाजूचा जबडा हा ट्युमरमुळे मोठा झाला होता. रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यात (Temporomandibular Joint) मध्ये ट्युमर झाला होता. ही सांध्यामध्ये झालेली गाठ काढण्यात आली व कॉस्मॅटिक सर्जरी करुन वाढलेले खालच्या जबड्याचे हाड कमी केले गेले’, असे डॉ. जे. बी. गार्डे यांनी सांगितले.

यास्मिन शेख ही मूळची जम्मू-काश्मीर येथील सीमेवर उरी सेक्टर भागात भारतीय लष्कराच्याजवळ राहणारी 21 वर्षीय मुलगी आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तिचा चेहरा जबड्यामुळे वाकडा होत असल्याचे लक्षात आले. जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेस प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जम्मू- काश्मीरमधील ‘असीम फाऊंडेशन’ या काश्मीरमध्ये शैक्षणिक, सामाजिक, रोजगार निर्मितीचे काम करणाऱ्या पुण्यातील तरुणांच्या संघटनेच्या बेकरीत काम करणाऱ्या यास्मिनला न्याय मिळवून देण्याचे संघटनेने ठरवले. संस्थेचे काम करणाऱ्या पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. संजय करवडे आणि ऑर्थोपेडिक डॉ. मिलिंद मोडक यांना याबाबत कळवले. या दोघांनी डॉ.जे.बी.गार्डे यांना रुग्ण समस्येबाबत माहिती देताच डॉक्टरांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेस होकार दिला. त्यामुळे आमच्या मुलीस नवीन जीवन मिळाले’, अशी माहिती यास्मिनच्या पालकांनी दिली. यामध्ये ‘असीम फाऊंडेशन’च्या निरूता किल्लेदार आणि सई बर्वे यांनी खूप सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

असीम फाऊंडेशन 

असीम फाऊंडेशन ही भारतातील सीमावर्ती भागात विशेषत: जम्मू-काश्मीर राज्यात कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेचे 10 वर्षांहून अधिक काळ हे काम सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांमध्ये संवाद, विश्वास आणि विकासाचे प्रामुख्याने ही संस्था करते. जम्मू-काश्मीर राज्यात उरी येथे अॅपल वॉलनट कुकीजच्या निर्मितीसाठी महिलांसाठी बेकरी सुरू करण्यात आली आहे. या बेकरीमध्ये ही रूग्ण कार्यरत आहे. पुण्यातील युवक नोकऱ्या करून पगाराचा काही भाग संस्थेला देऊन सामाजिक उपक्रम करतात. संस्थेचे संस्थापक सारंग गोसावी आहेत.

‘ओरल अॅण्ड मॅक्सिलोफेशिअल सर्जन म्हणून डॉ. जे.बी. गार्डे पुण्यात गेली 20 वर्षे कार्यरत आहेत. त्यांचे सातारा रोड येथे ‘अॅडव्हान्स्ड डेंटल क्लिनिक’ आहे, सामाजिक बांधिलकीतून अनेक शस्त्रक्रिया ते विनामूल्य करतात.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…

आरोग्यम् धनसंपदा : केसगळती कारणे आणि उपाय