fbpx

 मोदीजींप्रमाणे लेक्चर देण्यासाठी मला वर्ष लागतील”, मोदींच्या भाषणबाजीला राहुल गांधीचा टोला

-modi-and-rahul-gandhi

टीम महाराष्ट्र देशा – मोदीजींप्रमाणे लेक्चर देण्यासाठी मला वर्ष लागतील”, अशी टीका करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण शैलीवर निशाणा साधला आहे. सूरतमधील उद्योग जगतातील प्रतिनिधींच्या एका बैठकीला त्यांनी संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले. ”काँग्रेस आणि भाजपामध्ये केवळ एकच फरक आहे. त्यांना लेक्चर द्यायचे आहे, त्यांना तुम्हाला ऐकून घेण्याची इच्छा नाही. त्यांना लाऊडस्पीकरप्रमाणे तयार करण्यात आले आहे”, असे टीकास्त्र यावेळी राहुल गांधींनी सोडले आहे.

”तुम्ही तुमच्या समस्या लेखी स्वरुपात सांगा. मी वचन तर नाही देऊ शकत, मात्र त्या पाहेन आणि जर आमचे सरकार सत्तेत आले तर त्यांचे समाधान करण्यात येईल”, असेही यावेळी राहुल गांधी म्हणालेत. ”मी व काँग्रेस पक्ष उद्योगांची समस्या ऐकून घेऊ”, असं आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी दिले. याबाबत सांगताना ते पुढे असंही म्हणाले की, ‘आम्ही तुमच्या समस्या समजून घेऊ. सोडवण्याबाबत विचार करू आणि त्यावर कामदेखील करू’.

दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसबाबत सांगताना असे म्हटले की, ”लोकांच्या समस्या ऐकण्यात आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे”. नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेससहीत अन्य विरोधकांकडून 8 नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनात राहुल गांधी यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी राहुल गांधी यांनी असे म्हटले की, ”विचार करण्याची पद्धत बदलली आहे, कारण आधी त्यांना व्यवस्थेतील कमकुवत लोकांची मदत करायची इच्छा होती, मात्र आता व्यवस्थाच मजबूत करण्यावर प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कारण सर्व कामं गतीनं व्हावीत”.