‘इवांका ट्रम्प’ विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका हिची एक वेगळी ओळख देखील आहे.

टीम महाराष्ट्र देशा – आजपर्यंत अनेकदा राष्ट्राध्यक्ष किंवा सत्तेतील काही मंत्री मंडळी [परदेशातून भारताच्या दौर्यावर येतात. मात्र इवांका डोनाल्ड ट्रम्पशिवाय भारतात आल्याने अनेकांचे लक्ष तिच्यावर खिळले आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि उद्योगपती इवांका ट्रम्प सध्या भारताच्या दौर्यावर आहेत. हैदराबाद येथे जागतिक उद्योजक परिषदेचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात इवांका सहभागी झाली आहे.

इवांका ‘अर्थशास्त्र’ विषयाची पदवीधर आहे. इंग्रजीसोबतच तिला फ्रेंच भाषेचं ज्ञान आहे. इवांका ट्रम्पने जारेड कुशनेर सोबत 25 ऑक्टोबर 2009 साली विवाह केला. इवांकाला एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. इवांकाने डोनाल्ड ट्रम्प्च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या वेळेस कॅंम्पेन सांभाळले होते. The Trump Card आणि Women Who Work ही दोन पुस्तकं तिने लिहली आहेत.शाळेत असताना इवांका ट्रम्पने मॉडेलिंगदेखील केले आहे. अनेक बिझनेस मॅग्जिनच्या कव्हर पेजवर इवांका झळकली आहे. इवांका यापूर्वी हिऱ्याच्या  व्यापारामध्ये होती.

You might also like
Comments
Loading...