जो निभा ना सका पत्नी से दुसरो की सीडी बनवाएगा

modi vs hardik

टीम महाराष्ट्र देशा –  गुजरात  विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात सुरू असलेलं घमासान आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बनावट सेक्स सीडी दाखवून भाजप नेते घाणेरडा प्रचार करत आहेत, असा संताप व्यक्त केल्यानंतर, हार्दिकनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

१९७०च्या दशकातील ‘रामचंद्र कह गये सिया से’ या प्रसिद्ध गाण्याच्या आधारे हार्दिकनं एक गाणं तयार केलंय. जे पत्नीला सांभाळू शकले नाहीत, ते दुसऱ्यांची सीडी बनवत आहेत, असा चिमटा त्यानं मोदींचं नाव न घेता काढला आहे. हिंदुत्व, गो-हत्या, राम मंदिर या मुद्द्यांवरूनही त्यानं भाजपला, रा. स्व. संघावर ताशेरे ओढलेत.