मराठमोळ्या अनुजा पाटीलकडे महिला क्रिकेट संघाची धुरा

anuja patil

टीम महाराष्ट्र देशा – बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाची धुरा मराठमोळ्या अनुजा पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अनुजा पाटील ही मूळची कोल्हापूरची आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या ‘अ’ महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची ‘अ’ टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार आहे. तर 12 डिसेंबरपासून तीन टी 20 सामने बेळगावात होणार आहेत.

त्याआधी बांगलादेशचा संघ 26 आणि 28 नोव्हेंबरला अलुरमध्ये दोन सराव सामनेही खेळणारआहे.बीसीसीआयने काल (22 नोव्हेंबर) भारतीय ‘अ’ संघाची घोषणा केली. यातील अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या दोन लेकींची संघात निवड झाली आहे. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. तर बीडच्या कविता पाटीलनेही संघात स्थान मिळावलं आहे.