आधी खड्डे बुजवा मग बोला अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला.

 सरकार बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे मला रस्त्यावर उतरावे लागत आहे

टीम महाराष्ट्र देशा – सरकार बेजबाबदारपणे वागत असल्यामुळे मला रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशा प्रकारची आंदोलने करावी लागत आहेत. यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची आंदोलने करणार असून या आंदोलनामध्ये शेतक-यांच्या कर्ज माफीचा मुख्य मुद्दा असणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज रविवारी (दि. 26) ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले.

त्यावेळी ते बोलत होते. मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये पेपर तपासले न गेल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया घालवले. राष्ट्रवादीच्या राज्यात वीज कपात बंद होती.कोळसा घ्यायला पैसे नाहीत म्हणून वीज कपात केली. याच्या राज्यात पोलिसच जनतेला मारत आहेत. जिवंत माणसाला मारुन जाळल.. अस जिवंत माणसाला मारणार हे सरकार जीएसटी लावताना सामान्यांचा विचार केला नाही. आमची सत्ता असताना शहराला स्वच्छतेचा मान मिळवून दिला… आत्ताचे शहर बघितले तर सगळीकडे कच-याचे ढिग. शास्ती कर रद्द करणार होते पण तो रद्द झाला नाही… त्याचप्रमाणे रेड झोनचा प्रश्नही तसाच आहे.

प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देणार होते परंतु पंधरा पैसे देखील दिले नाहीत. कोपर्डी प्रकरणात दिरंगाई केल्याने हे हल्लबोल आंदोनल करावे लागत आहे. शहरात आधी नीट सुविधा द्या मग बुलेट ट्रेन आणा. मार्ग निघतात इच्छा शक्ती आणि नेतृत्व पाहिजे. हे सगळे फुसके बार आहेत. शेतक-यांची ट्रेन मध्यप्रदेशात गेली. बुलेट ट्रेल दुस-या देशात जाईन खड्डे पडले म्हणून आभाळ फाटल. आधी खड्डे बुजवा मग बोला, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला