राज्यात मोगलाई आहे, असे एकदाचे जाहीर तरी करावे ,उद्धव ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा

जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही.

टीम महाराष्ट्र देशा – राज्यात सध्याची गोंधळाची स्थिती असून जनतेला वेठीस धरणारे निर्णय घेतले जात आहेत. छत्रपतींच्या आधीची मोगलाई असे याचे वर्णन करावे लागेल. सरकारने आता राज्यात मोगलाई आहे, असे एकदाचे जाहीर तरी करावे, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला.

शिवसेना सत्तेत सहभागी आहे. परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर मी सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेला वेठीस धरण्याचे सरकारचे सध्याचे निर्णय पाहता असे करावेच लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील पक्ष मेळाव्यात बोलताना दिला.

रत्नागिरीतील माळनाका येथे दोन कोटी खर्चातून उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर येथील सावरकर नाट्यगृहात सेना मेळावा झाला. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, तालुकाप्रमुख बंड्या साळवी व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुजरातमधील विधानसभा निवडणूकीमुळेच मोदी सरकारला जीएसटी दर कमी करावे लागले. भाजपविरोधी वातावरणामुळे तेथे मोदींना ५० सभा घ्याव्या लागल्या. एवढे करूनही तेथे भाजप जिंकले नाही, जिंकण्यासाठी गडबड केली नाही, तर देशात मोदींना थारा नाही, हेच स्पष्ट होईल, असे ठाकरे म्हणाले.

You might also like
Comments
Loading...