मी आमदार होणारच – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा – विधान परिषदेसाठी जर मी उमेदवार असतो तर शिवसेनेमध्ये फूट पडली असती त्यामुळे शिवसेनेनं माझ्या उमेदवारीला विरोध केला. सध्या माझ्याविरोधात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत.  भाजपानं घेतलेली भूमिका मला मान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

bagdure

जूनच्या आधी काहीही होऊ शकते, त्यामुळे लवकरच आमदार होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा पत्ता कापून भाजपाने विधान परिषदेसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली.

आज त्यांनी मात्र तरीही राणेंना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळणार असल्याचं कळतंय. शिवसेनेचा नारायण राणेंबद्दलचा रोष पाहता हा निर्णय घेण्यात आला. मात्र राणेंना मंत्रिपद देऊन त्यांना 6 महिन्यात निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये राणेंची वर्णी लागू शकते. तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणेंना देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रीपद मिळणार का? याबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

 

You might also like
Comments
Loading...