fbpx

रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर

टीम महाराष्ट्र देशा –  जिओने नोकियासोबत आता करार केला आहे. कंपनी नोकियासोबत २ स्मार्टफोन मॉडेलवर फ्री 4जी डेटा देणार आहे.

१० जीबी ४जी डेटा फ्री
ही स्कीम नोकिया ८ आणि नोकिया ५ स्मार्टफोनवर दिली जाणार आहे. ही ऑफर ऑगस्ट २०१८ पर्यंत लागू असेल. नोकिया ८ स्मार्टफोन खरेदी करणारा ग्राहक जर जिओचा ३०९ रुपयांचा रिचार्ज करतो तर त्याला १० जीबी ४जी डेटा फ्री मध्ये मिळणार आहे.

१०० जीबी ४जी डाटा फ्री
ही ऑफर ऑगस्ट २०१८ पर्यंक असणार आहे. ग्राहक यामध्ये सर्वाधिक १० रिचार्जचा फायदा घेऊ शकतो. म्हणजेच १०० जीबी 4जी डेटा फ्रीमध्ये मिळणार आहे. नोकिया ५ स्मार्टफोनवर या ऑफरनुसार प्रत्येक महिन्याला ५ जीबी ४जी डेटा दिला जाणार आहे. या फोनवर ग्राहकांना एक वर्ष अतिरिक्त ५० जीबी ४ जी डेटा मिळेल. रिलायंस जिओने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.