मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक- परवेज मुशर्रफ

parvej musharf latest

टीम महाराष्ट्र देशा – पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आणि हुकूमशहा परवेज मुशर्रफ यांनी जाहीरपणे दहशतवादाचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी हाफिज सईद आणि त्याची संघटना लष्कर-ए-तय्यबाला पाठिंबा दिला. मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे असे मुशर्रफ यांनी सांगितले.

Loading...

दहशतवादी सईदचे समर्थन करणारे मुशर्रफ मात्र स्वत: फरार आहेत. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानी कोर्टाने मुशर्रफ यांना फरार घोषित केले आहे. मी लष्कर-ए-तय्यबाचा सर्वात मोठा समर्थक आहे. त्यांनाही मी आवडतो हे मला ठाऊक आहे असे मुशर्रफ म्हणाले. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या मदतीने हाफिजनेच लष्करची स्थापना केली आणि जमात उद दावा या संघटनेची राजकीय शाखा आहे.

लष्कर-ए-तय्यबावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. या संघटनेने भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. सईद काश्मीरमध्ये सक्रीय असून आपला त्याला पूर्ण पाठिंबा आहे असे मुशर्रफ म्हणाले. संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या हाफीज सईदची मागच्या आठवडयात पाकिस्तानी कोर्टाच्या आदेशावरुन नजरकैदेतून सुटका झाली.

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...