घरगुती सिलेंडरचे भाव पुन्हा भडकले

domastic gas cylinder

 टीम महाराष्ट्र देशा- तेल कंपन्यांनी 94 रुपये विनाअनुदानीत आणि 4 रुपये 56 पैसे अनुदानीत सिलेंडरमागे वाढवले आहेत. चार महिन्यांपासून गॅस सिलेंडरवर दर दरमहा चार रुपयांनी वाढ होत होती. परंतु मध्यरात्री पासून 93.50 रुपयांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरची किंमत 751 रुपये
झाली आहे.

आजपासून नवीन दर लागू

वाढत्या किंमतींचा परिणाम निम्न आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर होईल. 93 रुपयांची मोठी वाढ पहिल्यांदाच झाली आहे. नवीन दरांनुसार, आता 14.2 किग्रॅ विना-अनुदानित गॅस सिलिंडर 743 रुपयांना तर मुंबईत 718 रुपयांना मिळणार आहे. 19 किलो वजनाच्या सिलिंडरची किंमत 1268 रुपये आहे. अनुदानित सिलिंडर 491.13 रुपयांवरून वाढून 495.69 रुपये झाली आहे. वाढीव दर 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहेत.