माझ्याच इशाराऱ्यावरुन हिंसाचार;अखेर हनीप्रीतने तोंड उघडलं

hony prett gave confaction

25 ऑगस्ट रोजी बलात्कारी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर, पंचकुलातील हिंसाचार माझ्या इशाऱ्यावरच झाल्याचं हनीप्रीतने पोलिस कोठडीत कबूल केलं. या हिंसाचारात 36 जणांचा मृत्यू झाला होता. आधी पंचकुला हिंसाचारासाठी सव्वा कोटी रुपये वाटल्याचंही तिने मान्य केलं होतं.

बलात्कारी बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इंसाकडून अखेर पोलिसांनी सत्य वदवून घेतलं. पंचकुला हिंसाचाराच्या कटात सहभागी असल्याची कबुली हनीप्रीतने दिली आहे.पोलीस चौकशीत हनीप्रीतचा ड्रायव्हर राकेशने खुलासा केलाय की, पंचकूलामध्ये दंगे घडवून आणण्यासाठी हनीप्रीतने मास्टर प्लॅन तयार केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, हनीप्रीतनेच देशविरोधी व्हिडीओ बनवून व्हायरल केला होता.

बाबाला शिक्षा झाली तर जगाच्या नकाशावरुनच भारताचं अस्तित्त्वच मिटवून टाकू, अशी घोषणाबाजी या व्हिडीओमध्ये आहे. हा पुरावा हनीप्रीतच्या मोबाइलमध्ये आहे.