fbpx

उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुखांना आगळी-वेगळी भेट

udhav thakrey

टीम महाराष्ट्र देशा – फडणवीस सरकारने तीन वर्ष पूर्ण केली आहेत.या पार्श्वभूमीवर सत्तेत सहभागी असलेल पण वारंवार विरोधकांची भूमिका निभावणार्या शिवसेनेने सरकारच्या तीन वर्षपूर्तीचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे.  सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मात्र आनंद व्यक्त करण्याऐवजी सरकारविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त ‘घोटाळेबाज भाजप’ नावाची पुस्तिका छापण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे ‘घोटाळेबाज भाजप’ ही पुस्तिका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिली आहे.

या पुस्तिकेत भाजपच्या घोटाळ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या फोटोसहित घोटाळ्यांची माहिती यात आहे.

sevsena
file photo