आंदोलनकर्त्या शेतक-यांवरील गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी – सदाभाऊ खोत

sadabhu khot

टीम महाराष्ट्र देशा –  शेवगाव येथे ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर केलेल्या गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यात दोषी आढळणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे संकेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतक-यांची खोत यांनी भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते म्हणाले की, अन्नदात्या शेतक-यांवर लाठीमार करणे योग्य नाही. एफआरपीप्रमाणे उसाला भाव देण्याची शेतक-यांची मागणी आहे. त्यासाठी शेतक-यांनी आंदोलन केले. त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेचे कुणीही समर्थन करू शकत नाही, असेही खोत म्हणाले