RSS च्या शाखेवर अर्ध्या चड्डीतील महिलांना कधी बघितलं का? – राहुल गांधी

कधी बघितलंय का कुणी महिलांना RSS शाखांमध्ये अर्ध्या चड्डीत, मी तर नाही बघितलं कधी,असा सवाल करीत राहुल गांधी यांनी भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले आहे.

राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर असून. भाजप व संघामध्ये महिलांना सापत्नभावाची वागणूक मिळते. भाजपाचा मुख्य आधार आरएसएस आहे, या संघटनेत किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अकोटा, गुजरात येथे झालेल्या एका कार्यक्रमात गांधी बोलत होते.

भाजपा व संघामध्ये पुरूषी मनोवृत्तीचं राज्य चालतं व महिलांना तिथं स्थान नाही असा हल्ला राहुल गांधी यांनी भाजपवर चढवला आहे. जोपर्यंत महिला गप्प बसतात, तोंड उघडत नाहीत, तोपर्यंत ठिक असतं, परंतु महिलांनी तोंड उघडलं की त्यांना गप्प करायचं अशी भाजपाची व संघाची नीती असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. गुजरातमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर राहुल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.