भाजप आणि कॉंग्रेस एका माळेचे मणी- हार्दिक पटेल

टीम महाराष्ट्र देशा –  भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच असल्याची टीका काल हार्दिक पटेलने केली आहे. तो अहमदाबाद जिल्ह्यात एका सभेत बोलत होता.’तुम्ही कुणाला मत द्या हे मी तुम्हाला सांगणार नाही पण हे दोन्ही पक्ष सारखेच आहेत , कुणाला लोकांच्या समस्यांशी काही देणंघेणं नाही अशी सणसणाती टीका त्याने केली आहे. 4-5 जागांसाठी शहीद झालेल्या पाटीदार बांधवांना आपण विसरलं नाही पाहिजे असं ही त्याने सांगितलं.

तसंच इतके दिवस काँग्रेसशी वाटाघाटी करणार हार्दिक पटेल आता कुणाचं तिकीट नकोच, असा दावा करतोय. ‘मला कुणाचंही तिकीट नको. मला फक्त पाटीदार समाजाचं भलं हवं आहे’ असंही हार्दिकने यावेळी स्पष्ट केलं.
सध्या काँग्रेस-हार्दिक पटेलमध्ये जागांवरून वाद सुरू आहे. अशी बातमी आली होती की हार्दिकला ११ जागा हव्या आहेत, तर राहुल गांधी फक्त ४ जागा देण्यास तयार आहेत.