खळ्ळ खट्याक आंदोलनाचा पुढचा टप्पा;फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे घेणार जाहीर सभा

फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय? हे होणार स्पष्ट

टीम महाराष्ट्र देशा – मुंबई,पुणे यासह संपूर्ण महाराष्ट्र मनसेने फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी राज ठाकरे लवकरच मैदानात उतरणार आहेत. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे थेट जनतेशी संवाद साधणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच जाहीर सभा घेणार आहेत.रेल्वे स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्यासाठी दिलेलं अल्टिमेटम संपल्यानंतर, मनसेने ठाणे स्टेशनपासून खळ्ळ खटॅक आंदोलनाला सुरुवात केली होती.

कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर लोकांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.ही सभा कुठे होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. सेंट्रल मैदान किंवा इतर ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसे पदाधिकारी परवानगी घेतील.

फेरीवाल्यांविरोधात मनसेच्या आंदोलनची पुढची दिशा काय असेल, हे या सभेतून स्पष्ट होईल.