कॉंग्रेससोबत नातं नाही, पण आरक्षणाची मागणी त्यांना मान्य – हार्दिक पटेल

टीम महाराष्ट्र देशा – पाटीदार अमानत संघर्ष समितीचा नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी बोलताना हार्दिक पटेल यांनी सांगितले की, त्यांची आरक्षणाची मागणी कॉंग्रेसने मान्य केली आहे. सत्तेवर येताच कॉग्रेस आरक्षणावर प्रस्ताव आणेल’.

यासोबतच ते म्हणाले की, काही वर्गांना प्रमाणापेक्षा जास्त आरक्षण देण्यात आलं आहे. अशात सर्व्हे करून ज्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना आरक्षण दिलं जाईल. आमच्या मागण्या गुजरातच्या हिताच्या आहेत. पाटीदार समाजाला शिक्षण, नोक-या हव्यात. पाटीदारांना नियमानुसार ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलं जाऊ शकतं. कॉंग्रेससोबत कोणतंही नातं नाहीये, पण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या. कॉंग्रेसला आम्ही तिकीट मागितलं नाही, आम्हाला आरक्षण हवंय.

You might also like
Comments
Loading...