गुजरात निवडणूक : संजय निरुपम मुंबईतील २०० कार्यकर्त्यांसह गुजरात दौऱ्यावर

टीम महाराष्ट्र देशा –  आगामी गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस तर्फे मुंबईतून २०० कार्यकर्त्यांची फौज तयार करून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम मंगळवार, २१ नोव्हेंबर २०१७ पासून दक्षिण गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत, दक्षिण गुजरात विभागातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये दारोदारी फिरून आमचे कार्यकर्तेकाँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत तसेच गुजरातमध्ये काँग्रेसला प्रचंड बहुमताने जिंकून आणण्याचा निर्धार घेऊन आम्ही सर्व गुजरातला निघालेलो आहोत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

गुजरात निवडणुक दौऱ्यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी आज मुंबई काँग्रेस कार्यालयात संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. निरुपम म्हणाले की, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुजरातमधील लाखो लोक त्यांच्या सभेला गर्दी करत आहेत. शेतकरी, कामगार, उद्योजक, दलित, पाटीदार समाज अशा सर्व स्तरातून राहुल गांधींमुळे काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एका सर्वेनुसार गुजरातमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये याआधी ३० % चा फरक होता तो आता ६ % वर आलेला आहे. याचाच अर्थ काँग्रेसला सर्व वर्गातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

You might also like
Comments
Loading...