भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य व कुटुंबाला टाकले वाळीत

टीम महाराष्ट्र देशा –  भाजपकडून निवडणूक लढवली नाही म्हणून ग्रामपंचायत सदस्य आणि त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडून आलेल्या सदस्यावर सांगलीच्या स्थानिक भाजप नेत्याने दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील घाटगेवाडी गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक झाली. निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये मुख्य लढत झाली. यावेळी काँग्रेसचे ५ सदस्य आणि भाजपचे ५ सदस्य निवडून आले. यामध्ये भारत घाडगे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले.

मात्र त्याची किंमत त्यांना आता मोजावी लागत आहे. कारण निवडणुकीमध्ये भरत घाटगे यांना भाजपा नेत्यांनी पक्षातून निवडणूक लढवण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र घाटगेंनी भाजपकडून निवडणूक लढण्यास नकार दिला. विरोधकांना याचा राग आल्याने गावात दहशत असणाऱ्या विरोधकांनी भरत घाटगे यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकला.

घाटगे यांच्या पुतण्याचं ६ नोव्हेंबरला लग्न होतं. मात्र विरोधकांनी घातलेल्या बहिष्कारामुळे या लग्नाकडे कोणी गावकरी फिरकले नाही. इतकेच नाही तर घाटगे यांच्या भावकीतील लोकांनाही या लग्नाला जाण्यापासून रोखण्यात आलं. काहींना धमकी तर काहींच्या घराला बाहेरून कड्या लावण्यात आल्या होत्या, असा आरोप पीडित घाटगे यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...