सरकारची आश्वासने म्हणजे ‘लबाडाचं निमंत्रण आहे जे जेवल्याशिवाय काही खरं नाही पवारांचे सरकारवर टीकास्त्र

pm vs sharad pawar

टीम महाराष्ट्र देशा –  देशात कुठेही गेले की व्यापारी मोदी, मोदी करायचे. पण, जीएसटीने हेच व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. आता हेच गुजरातमधील व्यापारी ‘हो गई भूल कमल का फुल’ असे बिलाच्या पावतीवर लिहीत आहेत. सरकारची आश्वासने म्हणजे ‘लबाडाचं निमंत्रण आहे जे जेवल्याशिवाय काही खरं नाही’, अशी टीका शरद पवार यांनी केली.

देशात जीएसटी लागू होताच गुजरातमध्ये हजारो व्यापारी रस्त्यावर उतरले. सरकारने काही वस्तूंवरील कर माफ केल्याचे सांगितले. त्यात लिपस्टिक आहे. सरकारला लिपस्टिकची चिंता पडली आहे. लिपस्टिक रोज लागते काय? देशात सध्या कुटुंबाची जबाबदारी नसलेल्या लोकांचे राज्य आले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर वर्धा येथे केली.

वर्ध्यातील यमुना लॉनमध्ये शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, निवडणूक काळात मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. ‘अच्छे दिन’ आलेच नाहीत. सरकार शेतकऱयाला कर्जमुक्त करणार होते पण अजूनही शेतकरी कर्जमुक्त झाले नाही. कर्जमाफीवर आतापर्यंत सहा आदेश काढले. पण, एकही आदेश शेतकऱयांच्या हिताचा दिसत नाही. सरकारने हुकूम काढला आणि शेतकऱयांच्या कर्जाचे चावडी वाचन करा, असे आदेश दिले. आज शेतकरी हे सरकार माझी बदनामी करून पुन्हा आत्महत्येची वेळ आणत असल्याचा आरोप करीत आहेत, असेही पवार म्हणाले.