मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला हवा रामदास आठवलेंची मनसेवर खोचक ठिका

टीम महाराष्ट्र देशा – मनसे – कॉंग्रेस फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून आमने- सामने आले आहेत. रोज या वादाला नवीन वळण लागत आहे. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य केले आणि मराठी- अमराठी वाद आणखीच प्रखर झाला

आधी संजय निरुपम, नंतर देवेंद्र फडणवीस आणि आता रामदास आठवले यांनी या वादात उडी घेतली आहे.मनसे जर मुख्यमंत्र्यांना ‘भय्याभूषण’ पुरस्कार देणार असेल, तर मनसेला ‘हॉकर्स भूषण’ पुरस्कार द्यायला हवा, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी लगावला. ते कल्याणमध्ये बोलत होते.

मनसे आणि मुख्यमंत्र्यांच्या या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवलेंनी मनसेला टोला लगावला.मुंबईला वाढवण्यात मराठी माणसाचा वाटा आहेच, पण त्याचवेळी परप्रांतातून आलेल्या लोकांचं मुंबई वाढवण्यातलं योगदानही महत्त्वाचं आहे, असं आठवले म्हणाले.

कल्याणजवळच्या आंबिवलीत आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन झालं. त्याचे उद्घाटक म्हणून आठवले उपस्थित होते