महाराष्ट्र देशा ! मंगल देशा ! पवित्र देशा !

VIDEO: शेतकऱ्यांच खर जीवन दाखवणारा माझा चित्रपट – छोटा पुढारी

शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या छोट्या पुढाऱ्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री; काय आहे हा सिनेमा एकदा नक्की बघा घनश्यामची खास मुलाखत

टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेत्यांच्या स्टाइलमध्ये भूमिका मांडण्यासाठी घनश्याम दरोडे प्रसिद्ध आहे. वयाच्या अवघ्या १४ वर्षांचा घनश्यामचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. घनश्याम दरोडेचे व्हिडीओ इंटरनेटवरही चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शेतक-यांच्या प्रश्नांवर बोलणारा घन:श्याम राज्यात लोकप्रिय झाला.

आता पुन्हा घनश्याम दरोडे चर्चेत आला आहे. कारण हाच छोटा पुढारी आता रुपेरी पडद्यावर एंट्री मारत आहे. ‘मी येतोय’ या सिनेमातून छोटा पुढारी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकत आहे. हा सिनेमा छोटा पुढारी असलेल्या घन:श्याम दरोडेच्या जीवनावर आधारित आहे. असं असलं तरी हा सिनेमा शेतक-यांच्या प्रश्नांवर आधारित आहे. शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीमालाला मिळणारा भाव, सावकारी पाश आणि शेतक-यांबाबत सरकारची भूमिका यावर हा सिनेमा बेतला आहे

 

You might also like
Comments
Loading...