राजकारणासाठी विठ्ठल कारखान्याचे नाव कमलाई असं केलं : नारायण पाटील

करमाळा – जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा तालुक्याचे आराध्यदैवत कमलाई मातेचं नाव साखर कारखान्याला दिले मात्र त्या कारखान्याचे खरे नाव विठ्ठल साखर कारखाना असून राजकारण करण्यासाठी देवीच्या नावाचा वापर केला असल्याची टीका साडे येथे झालेल्या देशभक्त नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनल च्या जाहीर सभेत आमदार नारायण पाटील यांनी केली.

करमाळा तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू असून सत्ताधारी जगताप गटाबरोबर आमदार पाटील तसेच मोहिते पाटील गटाने युती केली आहे.तर या युती समोर बागल आणि संजय शिंदे यांच्या गटाने आव्हान निर्माण केल्याने सध्या तिरंगी लढत पहायला मिळत आहे.प्रचारात जगताप गटाने आघाडी घेतली असून सभांना देखील मोठी गर्दी पहायला मिळत आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील, खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाने जयवंतराव जगताप यांच्या सोबत युती केल्याने या तिघांच्या देशभक्त कै. नामदेवराव जगताप शेतकरी विकास पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

आमदार नारायण पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

जगताप पाटील युतीचा विजय निश्चित

– जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी करमाळा तालुक्याचे आराध्यदैवत कमलाई मातेचं नाव साखर कारखान्याला दिले मात्र त्या कारखान्याचे खरे नाव विठ्ठल साखर कारखाना असून राजकारण करण्यासाठी देवीच्या नावाचा वापर केला.

– भ्रष्टाचार करणाऱ्यांना वेशीच्या आत सुद्धा येऊ देऊ नका. लाथा घालून या मंडळींना बाहेर काढा.
– व्यापारी बनून येणारे आज राज्यकर्ते बनू पाहत आहेत.