अखेर पुणेकरांची पाणी कपात टळली

टीम महाराष्ट्र देशा – पुणे महापालिकेकडून जादा पाणी वापर केला जात असल्याचा ठपका माघील आठवड्यात पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. दरम्यान आज मुंबईमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये फेब्रुवारी 2018 पर्यंत पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात ना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 10 डिसेंबर पासून रब्बी हंगामासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

या बैठकीत महापालिका जास्त पाणी वापरात असल्याचा आरोपही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आले.मात्र, पालिकेकडून ते सर्व नाकारण्यात आले आहेत. या बैठकीत पाटबंधारे विभागाने मागणी केलेल्या 354 कोटीच्या थकबाकीवर कोणताही निर्णय झालेला नाही.