शेतकऱ्यांची बँक खाती रिकामीच.

शेतकरी कर्जमाफीच्या रकमा आजपासून बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सरकार कडून  आश्वासन देण्यात आले पण  राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक रकमा जमा झालेल्या नाहीत.

मुख्यमंत्री आणि राज्य स्तरिय बँक व्यवस्थापकांच्या बैठकीत आजपासून पहिल्या टप्प्प्यात लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचं निश्चित झालं. पण आज फक्त माहितीची देवाणघेवाणीची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यास सोमवार उजाडेल असंच बहुतांश जिल्हा बँकांचं म्हणणं आहे.

खरंतरं 18 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फ़डणवीसांच्या हस्तेकर्जमाफीची प्रमाणपत्र देऊन मुंबईसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कागदोपत्री पहिल्या टप्प्यात 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र अद्याप एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही.

कर्जमाफी लाभार्थींच्या यादीतील सर्व त्रुटी दूर करुन तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी असे आदेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बँक प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिले होते परंतु त्या आदेशाची पुर्तता अजूनपर्यंत झालेली नाही.

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या ग्रीन लिस्टमध्ये ज्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावर माहिती आणि तंत्रज्ञान विभाग आणि बँकांच्या चमुंनी एकत्रित बसून तोडगा काढावा. या यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते .पण आजदेखील कर्ज माफीची कोणतीही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. रक्कम जमा होण्यास किमान सोमवारचा दिवस उजाडेल असे बँकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

You might also like
Comments
Loading...