बनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारचा मोठा दिलासा

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची पंजाब पोलिसांच्या डीएसपी पदावरुन हकालपट्टी करण्यात आलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे.भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र असं असलं तरीही पंजाब सरकार हरमनप्रीतवर फसवणुकीचा कोणताही गुन्हा दाखल करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपअधीक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते. यानंतर हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने काढून घेतले आहे.

दरम्यान,“या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका चांगल्या क्रिकेटपटूच्या कारकिर्दीचे नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तसेच भविष्यात जर हरमनप्रीतने पदवी पूर्ण केली तर पोलीस उपअधीक्षक पदासाठी विचार केला जाईल.” पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग हरमनप्रीतच्या या प्रकरणावर बोलताना म्हणाले.

2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतची तीच्या या कामगिरीसाठी पंजाब सरकारने पोलिस उपअधीक्षक पदी निवड केली होती.मात्र उपअधीक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते.