…बाबा नाहीतर तुमची तक्रार मोदी अंकलकडे करेल मुख्यमंत्र्यांच्या मुलीची फडणवीसांना तंबी

टीम महाराष्ट्र देशा – सहज एक कागदाचा गोळा दिविजाला फेकून मारला तर तिने मला मोदींकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती असा किस्सा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. तसंच त्यांनी आपण लठ्ठ असल्याची कबुलीही दिली.

पुण्यात रोटरी क्लबने आज लहान मुलांमधील लठ्ठपणाची अर्थात ओबेसिटीची वाढती समस्या लक्षात घेऊन ती कमी करण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय. लहान मुलांमधील लठ्ठपणा काय असतो याचं उदाहरण मी सुद्धा आहे. मी लहानपणी लठ्ठ होतो, आताही आहे, मध्यंतरी कमी झालो, परत वजन वाढलं, हे असंच सुरू आहे अशी कबुली देऊन मुख्यमंत्र्यांनी एकच हशा पिकवली. तसंच आताही लठ्ठच असल्याचं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय.

तसंच स्वच्छता राखणं आपलं कर्तव्य आहे. पण घरी असताना मी सहज एक कागदी नॅपकिन गोळा करून दिविजाच्या दिशेनं फेकला. तर तिने मला पंतप्रधान मोदींकडे तक्रार करण्याची धमकी दिली, आता तुम्हीही कचरा करू नका असा सल्ला देत आपल्यावरील विनोदाचा किस्साच मुख्यमंत्र्यांनी सांगितला.

You might also like
Comments
Loading...