शिवसेनेचा विरोध असता तरी १०० टक्के निवडून आलो असतो – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा -नारायण राणे यांचा सध्या तरी पत्ता कात करण्यात आला आहे. सेनेने राणेंना विरोध केल्यामुळे राणेंची उमेदवारी नाकारण्यात आली. इतके होऊन देखील राणे यांनी भाजप समर्थनात भूमिका घेतली आहे.  विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाही. माझ्या उमेदवारीला शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही. मला पराभूत करण्यासाठी तीन पक्षांना एकत्र यावे लागते हाच माझा विजय आहे.

आगामी काळात काय चमत्कार होतो ते पाहा, मी आमदार होणारच, असा दावा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राणे यांनी निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काल रात्री आपली भेट झाली.

त्यांनी मांडलेली भूमिका मला पटल्याने व त्यांच्यावर विश्वास असल्यानेच निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा विरोध असता तरी १०० टक्के निवडून आलो असतो, असा दावा त्यांनी केला.

राणेंना मंत्रिपद देऊन त्यांना 6 महिन्यात निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. येत्या जुलैमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 12 जागांमध्ये राणेंची वर्णी लागू शकते. तसं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून नारायण राणेंना देण्यात आल्याचं कळतंय. त्यामुळे नारायण राणे यांना मंत्रीपद मिळणार का? याबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

You might also like
Comments
Loading...