फेरीवाल्यांच्या मदतीला कपिल सिब्बल धावले

kapil sibble

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात दाद मागणाऱ्या मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हायकोर्टाने दणका दिला होता. मुंबईत कुठेही फेरीवाल्यांना धंदा करु देण्याची मागणी हायकोर्टानं फेटाळली होती. शिवाय, मुंबईत फेरीवाल्यांना निर्धारीत फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्यास परवानगी हायकोर्टाने दिली. फेरीवाल्यांची हायकोर्टात बाजू मांडण्यासाठी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निष्णात वकील कपिल सिब्बल येणार आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी यासंदर्भात माहिती दिली.

कपिल सिब्बल यांच्या गाठीशी वकील म्हणून दांडगा अनुभव आहे. काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ नेते असलेले कपिल सिब्बल हे यूपीएच्या काळात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होते.मुंबई हायकोर्टाने 1 नोव्हेंबरला काय निर्णय दिला होता?फेरीवाल्यांसंदर्भातील 1 नोव्हेंबरला मुंबई हायकोर्टाने जो निर्णय दिला होता, त्या निर्णयाला संजय निरुपम आव्हान देणार आहेत आणि त्यासाठी कपिल सिब्बल मुंबईत येऊन हा खटला लढवतील.