निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा,

udhav thackeray latest 1

टीम महाराष्ट्र देशा – निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी अचानकपणे मध्यावधीचे संकेत दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातला प्रवेश जवळपास निश्चित झालाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील या दोघांनीही नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचे संकेत दिलेत. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातल्या संभाव्य प्रवेशावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेचा विरोध हा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही मध्यावधीचे संकेत दिले आहेत. त्याप्रमाणेच नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची संभाव्य तारीख चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर करून टाकल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.