राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नाही – एकनाथ खडसे

टीम महाराष्ट्र देशा – राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नाही, असं वक्तव्य केलंय भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी… जळगाव जिल्ह्यात भाजपच्या विस्ताराचं श्रेय संघ परिवाराला जात असल्याचं सांगत त्यात आपल्यासह डॉ अविनाश आचार्य, बापूराव मांडे, माजी खासदार गुणवंतराव सरोदे यांचा सहभाग असल्याचं माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

मात्र, यावेळी त्यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचं नाव घेणं टाळलं. तसंच राजकारणात पाय खेचणाऱ्यांची कमी नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव मांडे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशीही उपस्थित होते.