पावसाअभावी जळून चाललेल्या पिकांचे पंचनामे करा, आ. दिलीप सोपल यांची मागणी

Dilip Sopal

बार्शी : पावसाळा सुरू होऊन महिना उलटल्यानंतरही बार्शी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही, पावसाअभावी खरिपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे करून पीकविमा देण्यात यावा, अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह त्यांनी आज तहसीलदारांची भेट घेतली आहे.

Dilip Sopal

पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तूर, उडीद, सोयाबीन या सारख्या पिकांची पेरणी केली होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत, तसेच काही गावांमध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील दिसत आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

दरम्यान, पुरेशा पावसाअभावी तालुक्यामध्ये बहुतांश गावांमध्ये पिके जळून चालली असल्याचं दिसत आहे, तसेच किडीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत, पिकांचे पंचनामे करून पीकविमा मिळवून द्यावा, अशी मागणी केल्याची माहिती आ. दिलीप सोपल यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना दिली.

बार्शी बाजार समितीवर राऊत गटाला सर्वाधिक जागा मात्र सत्तेच्या चाव्या मिरगणे- आंधळकरांच्या हातीLoading…
Loading...