नगरचे डॉ.अमोल बागुल यांची स्वच्छतादूत म्हणून निवड

swatch bharat latest

टीम महाराष्ट्र देशा –  पेयजल व स्वच्छता मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर यांच्या वतीने डॉ.अमोल सुभाष बागूल यांची स्वच्छतादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने सुमारे ३ कोटी भारतीयांना स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन पाठवण्याचा डॉ.बागूल यांचा मानस आहे

.डॉ.बागूल यांनी जिल्ह्यातील सुमारे १५२ ऐतिहासिक वास्तूंची स्वतः स्वच्छता करून त्यातील ४ वास्तूंवर २१००० दिव्यांच्या रोषणाईचा ऐतिहासिक दिवाळी हा उपक्रम राबविण्यासह जिल्हा परिषदेच्या कर्मवीर भाऊराव पाटील शालेय स्वच्छता अभियानाअंतर्गत जिल्हा स्वच्छता समितीसह सुमारे ८०,००० विद्यार्थ्याना स्वच्छतेविषयक प्रबोधन केले आहे.

जि.प.च्या स्वच्छताकक्षाची सजावट, भुईकोट किल्ला स्वच्छता अभियानासह महानगरपालिकेच्या शहर-प्रभाग स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवला असून केंद्र सरकारचा स्वच्छता-ही-सेवा हा सन्मान देखील डॉ.बागूल यांना प्राप्त झाला आहे.सामाजिक माध्यमांतील-सोशल मीडियातील सुमारे १२४ मेसेजिंग अँपच्या माध्यमातून केंद्राचे स्वच्छताअँप,स्वच्छता योजना,स्वच्छता सर्व्हेक्षण,स्वच्छतेची प्रतिज्ञा, स्वच्छतेची सप्तपदी, घोषवाक्ये, चित्र, निबंध,कविता,पथनाट्य,माझी स्वच्छता सेल्फी,व्हिडिओ आदी स्वच्छतेचे ई-साहित्य बुलेटीन डॉ.बागूल महिन्यातून दोनदा ऑनलाईन पाठविणार आहेत. स्वच्छताविषयक प्रचार,प्रसार व जनजागृतीसाठी स्वच्छतादूतांची नियुक्ती शासनामार्फत केली जाते.