मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य करू नका ; एकनाथ शिंदेंची हर्षवर्धन जाधवांना ताकीद

eknath-shinde

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाबद्दल वक्तव्य करू नका, तुमच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत येत आहे. अशी सक्त ताकीद शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिली आहे.

दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भेट नाकारल्याच हर्षवर्धन जाधव म्हणाले होते. तर हर्षवर्धन जाधव यांनी मुंबईत विधान भवनासमोर ठिय्या मांडत आरक्षणाला पाठीबा दिला होता. हर्षवर्धन जाधव हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा देणारे पहिले आमदार आहेत. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी ते सुरवातीपासून आग्रही आहेत. दरम्यान, आता एकनाथ शिंदे यांच्या ताकीदीनंतर जाधव काय भूमिका घेतात याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठा आमदाराचा राजीनामा

मुस्लीम समाजाचा आरक्षणासाठी सरकारला इशारा

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

मराठा आरक्षण : आत्महत्यासत्र थांबेना औरंगाबादमध्ये तरुणाची आत्महत्या

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.