आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच…

shiv sena

‘सहा नगरसेवकांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरु असून आम्ही सहाही नगरसेवक शिवसेनेतच आहोत.’ अशी माहिती नगरसेवक दिलीप लांडे यांनी दिली. मनसेतून शिवसेनेत आलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 जण पुन्हा मनसेत जाणार असल्याच्या बातमीचे खंडन सहाही नगरसेवकांनी एक पत्रक काढून केले आहे

मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पुन्हा मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा मनसेने केला आहे. या नगरसेवकांशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे, तसंच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

या वृत्तानंतर शिवसेनेमध्ये एकच  खळबळ माजली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त फेटाळत, मनसेतून आलेले सहाही नगरसेवक एकत्र असून ते आमच्यासोबतच असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Loading...

 

1 Comment

Click here to post a comment