येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला ऑफलाईन करुन टाकेल’

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफी जाहीर केल्यापासून चार महिन्यात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या सरकारने कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्याच नाही तर योजनेला छत्रपतींचे नाव देऊन त्यांचाही अपमान केल्या. हे सरकार शेतकरी ही जाताच मुळापासून संपवू पाहत आहे. सगळं ऑनलाईन करा म्हणणाऱ्या सरकारला येत्या निवडणुकीत जनताच ऑफलाईन करुन टाकेल. असा टोला  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लावला .माढामधील साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

राज्यातील सगळे सरकारच अकार्यक्षम असून कोण कोणाला काढणार? आता वैतागलेली जनताच यांना नारळ देईल. अशी सडकून टीका धनंजय मुंडें यांनी यावेळी केली.राज्यावरील कर्जाचा बोजा सव्वा चार लाख कोटींवर गेला असून ३ वर्षात दीड लाख कोटी कुठे गेले याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावेच लागणार आहे. असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

You might also like
Comments
Loading...