सरकारच्या आश्वासनानंतरही मराठ्यांचा पुण्यात एल्गार !

पुणे : गेल्या दहा बारा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन महाराष्ट्रभर करताना दिसत आहे. त्याचा पार्श्वभूमीवर अनेक मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे आणि मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे यासाठी आज पुण्यात मराठा समाजाकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरुवात झाली, त्यानंतर शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन देऊन समारोप करण्यात आले. या मोर्चात सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्याचबरोबर पुण्यातील भाजपा कार्यालयाबाहेरही पोलिस बंदोबस्ताची खबरदारी घेण्यात आली होती.

राज्यभर मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाकडून ठोक मार्चचे आंदोलन करण्यात आले होते. याच दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर जगन्नाथ सोनवणे यांनी देखील विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या सर्व घटनानंतर राज्यातील मराठा समाजाने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन केले. अनेक ठिकाणी बस फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदविले गेले.

या पार्श्वभूमीवर आज पुण्यात मराठा आंदोलकांनी डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साडे अकरा च्या दरम्यान मार्च्याची सुरुवात केली. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप केला.

मराठा आरक्षण : अंबाजोगाईत मराठा आरक्षणासाठी ठिय्या

You might also like
Comments
Loading...