‘सिद्धरामय्या कसाबचीही जयंती साजरी करू शकतात’- अनंतकुमार हेगडे

anantkumar hedge

टीम महाराष्ट्र देशा – कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांनी उद्या दहशतवादी अजमल आमिर कसाबची जयंती कर्नाटकात साजरी केली तरीही आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका करत अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी याआधी टिपू सुलतानच्या जयंतीवरूनही सिद्धरामय्यांवर टीकेचे बाण चालवले होते. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा पुढे करत त्यांनी पुन्हा एकदा सिद्धरामय्यांवर टीका केली आहे. कित्तूरची राणी चिन्नम्माबाबत एखादा महोत्सव सुरु करावा किंवा त्यांची जयंती साजरी करावी अशी इच्छाशक्ती सिद्धरामय्या दाखवत नाहीत. कारण ते टिपू सुलतानसारख्या खुनी माणसाची जयंती साजरी करण्यात धन्यता मानतात, असेही हेगडे यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे झालेल्या एका जनसभेत त्यांनी हा आरोप केला आहे.