बुऱ्हानी विकास ट्रस्टनं घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

टीम महाराष्ट्र देशा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव पूर्ण झालाय. सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टनं या तीनही मालमत्ता विकत घेतल्यात. एकूण 9 कोटींना या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. भेंडी बाजार परिसराचा पुनर्विकास सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्ट करणार आहे. आतापर्यंत तिसऱ्यांदा दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आलाय.तस्करी आणि परकीय चलन हाताळणी अधिनियम 1 976 अंतर्गत दाऊदशी संबंधीत असलेली देशभरातली संपत्ती जप्त करण्यात आली होती.
कोट्यावधी रुपयांची संपत्ती सोडून दाऊद भारतातून पळून गेला. तस्करी आणि परकीय चलन हाताळणी अधिनियम 1 976 अंतर्गत दाऊदशी संबंधीत असलेली देशभरातली संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्यानंतर या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. याआधीही दोन वेळा दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आलाय.
दाऊदच्या मालमत्तेची विक्री
हॉटेल रौनक अफरोज – ४ कोटी ५२ लाख ५२ हजार
शबनम गेस्ट हाऊस- ३ कोटी ५२ लाख
डामरवाला इमारतीतील ६ फ्लॅट- ३ कोटी ५४ लाख

You might also like
Comments
Loading...