तुरूंग कच्च्या कैद्यांनीच झाले हाऊसफुल्ल

yerawada jai

टीम महाराष्ट्र देशा –   वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रागृहातील संख्याही वाढत आहे. राज्यातील मध्यवर्ती कारागृहांसह अन्य ५४ कारागृहांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांपेक्षा जास्त कच्चे कैदीच आहेत. सर्व कारागृहांत २७ टक्के शिक्षा झालेले, तर ७३ टक्के कच्चे कैदी आहेत.राज्यात वर्ग-१, अाणि २ ची एकूण ५४ कारागृहे असून त्यांची कैदी क्षमता २३ हजार ९४२ अाहे. या कारागृहांत सध्या एकूण ३१ हजार ४६४ पुरुष आणि १,४४५ महिला कैदी आहेत. यापैकी फक्त ८,३१८ पुरुष आणि ३७० महिलांनाच शिक्षा झालेली आहे. या कैद्यांच्या निवास, भोजन, सुरक्षा, काैशल्य प्रशिक्षण, कामे अादी बाबींची व्यवस्था करताना प्रशासनाला रोज तारेवरची कसरत करावी लागत अाहे. या कैद्यांकडून काेणत्याही प्रकारचा उपद्रव हाेऊन कारागृहात कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी प्रशासनाला नेहमीच दक्ष राहावे लागतेLoading…
Loading...